Sunday, 10 May 2026

उमलले आभाळभर : वैभव जोशी

अप्रतिम कविता , संगीत आणि गायन !!! 

गीत - वैभव जोशी ; संगीत- हृषिकेश-सौरभ-जसराज ; स्वर-अनुराधा कुबेर 

 

उमलले आभाळभर हे चांदणे माझे तुझे
लपवुनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे

दरवळाया लागली हि शांतता दोघातली
केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे

हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो
आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे

दोन क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा 
सोसले नाही ऋतूंना थांबणे माझे तुझे 

तू मला अन मी तुला वाचून पाहू चल पुन्हा 
फार झाले या जगाला चाळणे माझे तुझे 

उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा
एकमेकानातुन आता तेवणे माझे तुझे



निळ्या अक्षरातली ही दोन कडवी कविराजांनी मूळ गाणे रेकॉर्ड झाल्यानंतर लिहिलेली आहेत





Friday, 8 May 2026

How lucky we are : Gregory Orr


How lucky we are
That you can’t sell
A poem, that it has
No value. 

Might
As well
Give it away.

That poem you love,
That saved your life,
Wasn’t it given to you?

.............

धागा : स्वाती भगत

धागा  शाबूत असला, की त्यात ओवता येतात फुलं पुन्हा पुन्हा 

तू 
तुझ्या बाजूने गाठ धरून रहा 
मी माझ्या बाजूने ओवत जाईन एकेक शब्द 

आपल्यात संवाद असला की सुगंध येईल त्यातून 
आणि 
आपल्यात अबोला असला कि सुगंधाची आठवण येईल 

तुझ्या माझ्यात 
येत जात राहील जगणं ...

तो धागा धरून 

तू 
मी 
शाबूत असेपर्यंत 

इतकंच 

....................
 

चाहत : आशु दीक्षित

 


By Sriram Hasabnis


 

Sunday, 26 April 2026

मातृभाषा : अदनान कफ़ील 'दरवेश'

 



विषय संपला. : रंजना बाजी यांच्या facebook post वरून

 



- अगं, या पातेल्याला चीर पडली आहे. त्यातनं पाणी गळतंय.
- मला माहित आहे. मी रोज वापरते. माझ्या कॉफीसाठी यातच पाणी गरम करते. गेली दहा बारा वर्षं हे आपल्या घरात आहे. तू बहुतेक आज पहिल्यांदा वापरलं असावंस.
- असलं मोडकं कशाला घरात ठेवायचं? कळकट पण झालंय. फेकून दे. एवढं पाहिजेच असेल तर असलं नवीन पातेलं घेऊन ये.
- आई गेल्यावर तिच्या घरातून कशाबरोबर तरी आलं आहे. तिच्या रोजच्या वापरातलं होतं.
विषय संपला.