तो ओठांवरती माझ्या ओठांनी लिहितो गाणी
मग चंद्र उतरतो देही, अलवार साखरीवेळी
आसक्त मनाला येते मंतरली मोहक हाळी
गात्रातुन माझ्या सजते स्पर्शाची चांदणखेळी
व्याकुळले स्पंद बिलगती मौनाची भाषा कळता
देहाचे छंद विहरती श्वासांचा झोका झुलता
बंधाची लाज विखुरते सैलावत धागा तुटतो
तृष्णेच्या काठावरती प्रणयाला येते जाग
बेधुंद सुरातुन खुलतो तृप्तीचा आतुर राग
गंधाळुन उमलत जाते केशरी दिठीचे फूल
उत्कट मोहाला पडते निःशब्द सुखाची भूल
धुंदीचे उधळत जातो तो ठसे बिलोरी कायी
भासांना ठेउन जातो हळुवार क्षणांच्या ठायी
घेऊन उशाला आठव आश्वस्त होउनी निजते
ओघळत्या डोळ्यांमधुनी झिरमिरते स्वप्न उतरते
No comments:
Post a Comment