धागा शाबूत असला, की त्यात ओवता येतात फुलं पुन्हा पुन्हा
तू
तुझ्या बाजूने गाठ धरून रहा
तुझ्या बाजूने गाठ धरून रहा
मी माझ्या बाजूने ओवत जाईन एकेक शब्द
आपल्यात संवाद असला की सुगंध येईल त्यातून
आणि
आपल्यात अबोला असला कि सुगंधाची आठवण येईल
तुझ्या माझ्यात
येत जात राहील जगणं ...
तो धागा धरून
तू
मी
शाबूत असेपर्यंत
इतकंच
....................
No comments:
Post a Comment