Thursday, 25 June 2026

कवितेचा हात : -पूजा भडांगे


लिहून खोडलेल्या असंख्य गोष्टी
फाडून फेकलेली कित्येक पानं
शांत राहून मनातल्या मनात गिळलेली शेकडो दुःखं
डोळे मिटून आटवलेला प्रत्येक अश्रू
अकालीच स्वभावात उतरलेलं मौन
स्वप्नांत मारलेल्या कितीतरी हाका
वाचता वाचता गोठून गेलेला सगळा वर्तमान
आणि स्तब्ध होत पुढ्यात उभं राहिलेलं शहाणपण
कवितेच्या समोर उभं राहून एक वेगळं जग दाखवतं तेव्हा;
आपण कवितेचा हात घट्ट पकडूनच हा पूल पार करु शकतो इतकंच कळतं.

.....................

 

No comments:

Post a Comment