Sunday, 16 August 2026

एक कविता : द. भा. धामणस्कर

 

आत्यंतिक प्रेम करावं असं काही
कुणाला आढळलं की नेमकं
उध्वस्त करणारच काही त्याला
सापडलेलं आहे हे सत्य निष्पाप माणसाला सांगायच नाही
असा ज्ञानी माणसानं निर्धार करायचा

आणि असाही की
जे अटळच आहे ते
आपल्यामुळे लवकर न येवो,

जे अटळच आहे त्याला
पूर्वतयारीशिवाय
निर्णायकपणे भिडण्याची कुणाची संधी
लांबणीवर न पडो...

ज्ञानी होण्याची सनद
इतरानांही मिळो -
जळत जळत सारे त्यांना (ही)
कळत जावो...

.....................

जगावेगळी कविता लिहिणाऱ्या या कवीला श्रद्धांजली !


No comments:

Post a Comment